पालखी सोहळ्यातील साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं

आषाढी वारीत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची विठ्ठलभक्ती

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
पंढरपूर
prajakta gaikwad आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिरसात रंगून गेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांमुळे राज्यभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या सहभागाची विशेष चर्चा रंगली आहे.
 

jki
 
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंची प्रभावी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली प्राजक्ता गायकवाड नुकतीच पालखी सोहळ्यात सहभागी झाली. विठ्ठलभक्तीने भारावलेल्या प्राजक्ताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिच्या साधेपणाचे आणि भक्तिभावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.लखी सोहळ्यात सहभागी होताना प्राजक्ताने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कपाळावर बुक्का आणि गंध, गळ्यात तुळशीची माळ तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेत ती वारकऱ्यांसोबत विठ्ठलनामाचा गजर करत चालताना दिसली. तिचा हा साधा, पारंपरिक आणि भक्तिमय लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.या अविस्मरणीय क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्राजक्ताने “वारी चुकायची नाही...” असे कॅप्शन दिले आहे. सध्या ती तिच्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून, मालिकांच्या शूटिंगमुळे कलाकारांना दररोज १२ ते १४ तास काम करावे लागते. अशा धावपळीच्या आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने पालखी सोहळ्यात सहभागी होत विठ्ठलाचे दर्शन घेतले. तिच्या या श्रद्धा, भक्तिभाव आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.