वर्धा,
raghav-phate : स्थानिक सुदामपुरी येथील राघव नरेश फाटे याने तबल्याच्या तृतीय परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मानस प्रगती संगीत विद्यालय, वर्धा येथे एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अवघ्या बाराव्या वर्षी त्याने हे यश मिळवले आहे. वडिलांकडून मिळालेल्या संगीताच्या संस्कारांचा वारसा जपत त्याने गायन आणि तबलावादन या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. संगीतासोबतच बास्केटबॉल खेळातही राघवने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली आहे. यशाचे श्रेय गुरुवर्य शंकर तिखे, आई-वडील व आजी यांना दिले आहे.