नागपूर
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेच्या नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.
प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी, किरण पांडे व प्रा. पायल पशीने यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकास, करिअर नियोजन व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बारामती येथील करिअर कट्टा शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनीही आपले अनुभव कथन केले.कार्यक्रमाला संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. मारोती वाघ व संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सायली लाखे पिदळी यांनी, सूत्रसंचालन प्रा. पायल पशीने यांनी, तर आभार प्रा. शुभांगी वाघ यांनी मानले.
सौजन्य: प्रा. सायली लाखे पिदळी /संपर्क मित्र