१४ लाखांच्या दारुच्या बाटल्यांवर चालविला रोडरोलर

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
वर्धा,
roadroller-driven-over-liquor-bottles : १६ जुलै विविध देशी-विदेशी दारुच्या कारवाईतील तब्बल १४ हजार ९१ हजार ९३० रुपयांच्या दारुच्या बाटल्यांवर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई देवळी येथे आज १६ रोजी करण्यात आली.
 
 
 
kl
 
 
२०२१ ते आजपर्यंत देशी-विदेशी दारुच्या १५९ गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते. आज गुरुवारी देशी दारुच्या ८ हजार १७६ बाटल्या, विदेशी दारुच्या १ हजार ४४ बाटल्या, असा १४ लाख ९१ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल देवळी येथील निर्जनस्थळी नेऊन रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, देवळी येथील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.