एसटी बसला भीषण आग

जीवित हानी टळली

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
st-bus-catches-massive-fire : वाशिम-पुसद मार्गावर धावणाèया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला मंगळवारी रात्री 7.30 च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने प्रवाशात खळबळ उडाली. सुदैवाने चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली.
 
 

y16July-Aag 
 
 
 
मात्र काही क्षणांतच बसचा समोरील भाग आगीच्या विळख्यात सापडला. वाशिमहून पुसदकडे वाशिम डेपोची बस एमएच14 बीटी4558 प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. बस वेगात असताना सुकाणू चाकाजवळून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली.
 
 
वाहक व चालकाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरवले. बसने काही क्षणांतच पेट घेत आगीने रौद्ररुप धारण केले. बघता बघता बस ज्वाळांनी वेढली गेली. प्रवाशांनी व रस्त्याने ये-जा करणाèया वाहनधारकांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी अनुभवला.
 
 
या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला मिळताच अग्निशमन दल, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रुद्ररुप धारण केले होते. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र या बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.