एमआयडीसीत ५० लाखांचा बनावट गुटख्याचा साठा जप्त

एफडीए व पोलिसांची संयुक्त कारवाई

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अकोला,
stock of counterfeit gutkha अकोला-येथील एमआयडीसी फेज चार मध्ये एका गोदामावर गुरुवार, १६ रोजी छापा टाकत बनावट गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी गोदामात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून फॅक्टरी व गोदाम मालकावर मकोका अंतर्गत कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
 
stock of counterfeit gutkha
 
 
गेल्या महिन्यात एमआयडीसी फेस फोर या ठिकाणी बनावट बियाणे व जैव उत्तेजकांचा साठा कृषी विभागाने धाड टाकून जप्त केला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा गुटख्याचा कच्चामाल व लेबल पोलिसांनी जप्त केले असून याची किंमत जवळपास ५० लाखाच्या घरात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून एमआयडीसी पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू होता. दरम्यान राज्यभरात एफडीआयच्या कारवाया सक्रिय झाल्याने बनावट पदार्थाची विक्री करणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्या अंतर्गत अकोला एमआयडीसी परिसरात ही कारवाई झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे असून हा माल कुठे विकला जात होता. याची सुद्धा चौकशी पोलीस तपासात होणे गरजेचे आहे.