भाजपा कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
कोल्हापूर
Suraj Sakhare  शहरात भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, भाजपचा कार्यकर्ता सुरज साखरे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून, जखमी झालेल्या सुरज साखरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

dshd  
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरज साखरे हे भाजपचे कार्यकर्ते आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून त्यांच्या गटातील काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून, ते घटनास्थळावरून पसार झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.