आरोग्य भारतीच्या ११ व्या स्वर्णप्राशन केंद्राचे उद्घाटन

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Swarnaprashan Center आरोग्य भारतीच्या वतीने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ११व्या स्वर्णप्राशन केंद्राचे उद्घाटन डॉ. रवींद्र क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली वैद्य आनंद टेंभुर्णीकर व डॉ. राजू मिश्रा यांच्या हस्ते झाले.

gold 
 
धनगरपुरा येथील आंतरभारती शाळेत सुरू झालेल्या या केंद्रात उद्घाटनदिनी १०३ बालकांना स्वर्णप्राशन देण्यात आले. डॉ. माधुरी इंदुरकर या केंद्रप्रमुख असून दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी येथे स्वर्णप्राशन देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्य पलाश बांधेकर, डॉ. अर्पिता चन्ने, डॉ. सुरेखा वानखेडे, डॉ. अल्का कांबळे, सुषमा गेडाम व राजश्री डोंगरे यांनी सहकार्य केले.
सौजन्य:डॉ. माधुरी इंदुरकर,संपर्क मित्र