वरोडा,
vekoli ekona वरोडा शहरालगत असलेल्या एकोणा कोळसा खाणीमध्ये गुरूवार, 16 जुलै रोजी पहाटे झालेल्या घटनेत कोळशाचा ढिगारा खचल्याने एक मजूर त्याखाली दबून मरण पावला.
एकोना एकूण येथील खान क्रमांक एक मध्ये गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान कोळशाच्या गाड्या भरल्या जात होत्या. यावेळी एमएच 34 बिजे 091 क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोळसा भरत असताना कोळशाचा ढिगारा अचानक पुष्पेन्द्र सिंग या मजुरावर पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी असलेल्या इतर मजुरांनी त्याला तातडीने वरोडा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा ट्रक चढ्ढा कंपनीचा असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
या मृत्यूबद्दल जोपर्यंत वेकोलि, जीएमआर आणि चढ्ढा कंपनी मृतकाच्या वारसांना नुकसान भरपाई देत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतल्यामुळे वृत्त लिहीपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कामगार संघटनांनी कामगारांना वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण आणि पीएफची सुविधा द्यावी, अशी मागणी केली.