स्मार्ट मीटरविरोधात ढाणकीत सर्वपक्षीय मोर्चा

ढाणकी कडकडीत बंद

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
ढाणकी, 
smart-meters : राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात ढाणकी शहरात सर्वपक्षीय, विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने गुरुवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान स्मार्ट मीटर योजना तत्काळ रद्द करावी, वाढत्या वीजदरांवर नियंत्रण आणावे व सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे निर्णय मागे घ्यावेत, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विजयंत्रणेची देखभाल करावी, सहायक अभियंता राहुल नाखले यांची बदली करावी, या प्रमुख मागण्यासाठी महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
 
 
 
y17July-Band
 
 
 
यावेळी ढाणकी शहरातील व्यापाèयांनी दुपारी 12 वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. आठवडी बाजारातून या मोर्च्याला सुरुवात झाली, त्यानंतर आंदोलकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत महावितरण प्रशासन व अभियंता राहुल नाखले यांचे विरोधात घोषणाबाजी केली. ऊर्जामंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढून अंत्ययात्रा काढण्याची तयारी सुरु असताना पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आंदोलकांकडून पुतळा ताब्यात घेतला.
 
 
आंदोलकांनी कार्यकारी अभियंता घटनास्थळी येईपर्यंत रस्त्यावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले होते. ठाणेदार शिंदे यांनी मध्यस्थी करत आंदोलक व कार्यकारी अभियंता पुंजाराम चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणत, व लेखी आश्वासन घेत आंदोलनाची शांततेत सांगता करून घेतली.
 
 
विविध राजकीय पक्षांच्या पुढाèयांमध्ये बाळू चंद्रे, दत्तदिगंबर वानखेडे, बाळू योगेवार, शेख सादिक, सय्यद माजिद, रमेश गायकवाड, गजानन मिटकरे, गणेश नरवाडे, संभाजी गोरटकर, सूर्यकांता वासमवार, संबोधी गायकवाड, प्रशांत विनकरे, उत्तम गायकवाड, राहुल नरवाडे, किशोर ठाकूर, बाबुराव नरवाडे, संतोष मंतेवाड, सहभागी होते.