तभा वृत्तसेवा
उमरखेड,
prakash-devsarkar : शेतकèयांच्या आर्थिक उन्नतीचा तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शेत पांदण रस्त्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाèया मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेच्या उमरखेड महागाव विधानसभा सहअध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश देवसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
15 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासन निर्णयाद्वारे राज्यातील विधानसभानिहाय सहअध्यक्ष पदांची नावे जाहीर केली. त्यात उमरखेड महागाव विधानसभा सहअध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश देवसरकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
14 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयान्वये ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजना’ सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.