सेलू
ashok-kalode : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेच्या वर्धा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी अशोक कलोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांचा विकास, शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सुविधा आणि शेतीपूरक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची आहे. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सर्व ऋतूंमध्ये पोहोचता येईल, असे दर्जेदार रस्ते निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.