इशानच्या सल्ल्याने बटलरचा खेळ खल्लास

अक्षर पटेलने पुढच्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
कार्डिफ,
Axar shattered the stumps. कार्डिफ येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने २३४ धावांचे लक्ष्य उभे केले. या सामन्यात केएल राहुल आजारी असल्यामुळे इशान किशनला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली. फलंदाजीत मोठी खेळी करता आली नसली तरी, यष्टीमागे त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तो चर्चेचा विषय ठरला. त्याच्या एका सूचनेमुळे अक्षर पटेलने पुढच्याच चेंडूवर इंग्लंडचा धोकादायक फलंदाज जोस बटलरला त्रिफळाचीत केले२३४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि संघाने ९४ धावांवर चार गडी गमावले. त्यानंतर जो रूट आणि जोस बटलर यांनी ३१ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताला या जोडीची भागीदारी मोडायची होती. डावातील २६ व्या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर यष्टीमागे उभ्या असलेल्या इशान किशनने अक्षर पटेलला, "स्टंपवर चेंडू अडकतोय, याच लाईनवर गोलंदाजी कर, चेंडू वळेल," असा सल्ला दिला.
 
 

idhan 
इशानचा सल्ला अक्षर पटेलने तात्काळ अमलात आणला. पुढच्याच चेंडूवर बटलरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू वळला आणि थेट यष्टींवर आदळला. १७ धावांवर बटलरचा डाव संपुष्टात आला आणि भारताला अत्यंत महत्त्वाची विकेट मिळाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या सामन्यात इशान किशनने यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी करत एकूण चार झेल टिपले. या कामगिरीमुळे तो एका विशेष यादीत सामील झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर एका सामन्यात चार बळी (झेल/स्टंपिंग) घेणारा तो संयुक्तपणे तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला. या यादीत अव्वल स्थानावर महेंद्रसिंह धोनी असून, त्यांनी २००७ मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.