समुद्रपूर,
sameer-kunawar : गावात राज्य परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जनता विद्यालय व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र डागा, सचिव रोशन डागा, सरपंच अरवींद्र झाडे, पोलीस पाटील अरविंद जोगवे, किशोर तांदुळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आ. समीर कुणावर यांच्या पुढाकाराने मंगरूळ येथे बस पोहोचली. पहिल्यांदाच आलेल्या बसचे गावकर्यांनी स्वागत केले.
महाराष्ट्र परिवहन मंडळाची हिंगणघाट-कोरा-सिल्ली-धामणगाव-दसोडा मार्गे मंगरूळ अशी बस सकाळी ९.३० वाजता हिंगणघाटवरून निघून १०.४५ वाजता मंगरूळ येथे पोहोचेल तर १०.४५ व सायंकाळी ४:४५ वाजता याच मार्गे परत मंगरूळ-दसोडा- धामणगाव-सिल्ली-कोरा-हिंगणघाट पोहोचणार आहे. या बससेवे मुळे ग्रामस्थांना व विद्याथ्र्यांना अतिशय सोयीच्या वेळी दळणवळणाचे साधन उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
पहिल्या फेरीमध्ये शाळेचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानदेव श्रीरामे यांनी प्रवास केला. मंगरूळ गावात बस पोहोचल्यावर पंचक्रोशीच्या वतीने व मंगरूळ ग्रामस्थांच्या पुढाकारांने मुख्याध्यापक अरुण काचोळे यांच्या हस्ते बसचे पूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी चालक प्रभाकर गेडाम व वाहक दिलीप दाहाळे यांचा सत्कार करण्यात आला.