डॉ. मंगेश साठे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
dr mangesh sathe सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय मानवाधिकार संघटने विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉ. मंगेश साठे यांना प्रतिष्ठेचा ’समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड येथील गुलमोहर हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. वैयतिक कर्तृत्व आणि राष्ट्रीय विकास आत्मनिर्भर भारत या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

dr mangesh sathe 
 
अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत, माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी आणि माजी खासदार जे. के. जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डेविड राज, राष्ट्रीय उपाध्यक्ष जोसब मालबारी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांच्यासह देशातील विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. मंगेश साठे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, मानवाधिकार जनजागृती, सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य आणि सेवाभावी उपक्रमांची दखल घेत समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.dr mangesh sathe पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. साठे यांनी हा सन्मान समाजसेवेसाठी अधिक प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय, वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि जनहिताच्या कार्यासाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यत केला. डॉ. मंगेश साठे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विदर्भासह राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, मानवाधिकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.