वाशीम,
female accused arrest लिव्ह - इन रिलेशनशिपमधील वाद आणि फसवणुकीच्या रागातून २५ जून २००४ रोजी झालेल्या एका खून प्रकरणात गेल्या २२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी महिलेला अटक करण्यात वाशीम पोलिसांना अखेर यश आले आहे. पंचशीला उत्तम थोरात (वय ४२ ) रा. वाशीम, सध्या रा. खंबालिया, गुजरात) असे आरोपी महिलेचे नाव आहे. सोशल मीडियावरील एका फोटोच्या सुगाव्यावरून पोलिसांनी अत्यंत हुशारीने या लिष्ट गुन्ह्याचा छडा लावला.

याबाबत सविस्तर असे की, सन २००२ मध्ये पंचशीला थोरात आणि तोंडगाव येथील रहिवासी तथा मृतक माधव सदाशिव गोटे (वय २०) यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही घरून पळून गेले होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, माधव गोटे याने लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि नंतर पंचशीलाला सोडून दिले. या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या पंचशीलाने माधवविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ते प्रकरण वाशीमच्या न्यायालयात सुरु होते. गुन्हा दाखल होऊनही माधवचा त्रास कमी झाला नव्हता. तो वारंवार पंचशीलाच्या घरी जाऊन जबरीने शरीरसंबंध ठेवत आणि अत्याचाराची केस मागे घेण्यासाठी धमकावत आणि छळ करत होता. या रोजच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पंचशीलाने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. २५ जून २००४ रोजी माधव झोपेत असताना, पंचशीलाने त्याच्या गळ्यावर वस्तर्याने वार केले आणि डोक्यावर दगड मारून निर्घृणपणे त्याचा खून केला. गुन्हा घडल्यानंतर पंचशीला हिला अटक झाली आणि ती सुमारे ६ महिने वाशीम जिल्हा कारागृहात होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली.
वाशीम सत्र न्यायालयाने तिला दोषी ठरवल्यानंतर तिने हायकोर्टात अपील केले, जिथे तिची जन्मठेपेची शिक्षा कमी करून १० वर्षे करण्यात आली. या निर्णयाविरोधात तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, परंतु सुप्रीम कोर्टानेही १० वर्षांची शिक्षा कायम ठेवली. हा अंतिम निकाल लागल्याचे समजताच ती पोलिसांना चकमा देऊन फरार झाली आणि थेट गुजरातमध्ये पोहोचली. तिथे तिने ओळख लपवून एका गुजराती तरुणाशी लग्न केले आणि संसार थाटला. पोलिस जाळ्यात अडकू नये म्हणून तिने स्वतः मोबाईल वापरला नाही.
परंतु, तिचा पती मोबाईल आणि सोशल मीडियाचा नियमित वापर करायचा. पतीने सोशल मीडियावर पंचशीलासोबतचे काही फोटो अपलोड केले होते. वाशीम सायबर पोलिस आणि तपास पथकाने याच फोटोंचा अचूक माग काढला आणि २२ वर्षांनंतर तिच्यापर्यंत पोहोचण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.female accused arrest दोन दोन दशकांहून अधिक काळ लोटल्याने आणि वयानुसार तिच्या चेहर्यात प्रचंड बदल झाला होता. त्यामुळे समोर दिसणारी महिला हीच ती फरार पंचशीला थोरात आहे का, असा मोठा प्रश्न पोलिसासमोर उभा ठाकला होता. यावर मात करण्यासाठी पोलिसांनी पंचशीलाच्या जुन्या ओळखीतील आणि नातेवाईक असलेल्या काही लोकांना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यांची ओळख परेड घेऊन खात्री पटवण्यात आली आणि अखेर तीच खरी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
वाशीम पोलिसांनी स्थानिक सायबर शाखा आणि गुजरात येथील खंबालिया पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचला. वाशीम शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय रवी सैबेवार, एएसआय कैलास कोकाटे, एलएचसी कविता, हेकॉ शैलेश ठाकूर, पोकॉ महादेव भिमटे, नितीन काळे, हरीश गावंडे, उमेश देशमुख आणि पथकाने अत्यंत गुप्ततेने ही कारवाई केली. सत्र न्यायालय, वाशीम यांच्याकडील वॉरंटनुसार तिला अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.