
trump students सध्या, एफ, जे आणि आय व्हिसाधारक त्यांच्या अभ्यासक्रम, एक्सचेंज प्रोग्राम किंवा माध्यमामधील नोकरीच्या संपूर्ण कालावधीसाठी अमेरिकेत राहू शकतात. नवीन नियमानुसार, या व्हिसाधारकांना आता केवळ चार वर्षेच राहण्याची परवानगी असेल. ट्रम्प यांच्या निर्णयाने भारतीय विद्यार्थी आमि नोकरदारांची चिंता वाढली आहे. या निर्णयाने अमेरिकेत राहणाऱ्या ३ लाखांहून अधिक भारतीयांवर मोठा परिणाम होणार आहे. ट्रम्प यांच्या आदेशाने अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ विभागाने नवे नियम जारी केले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एफ व्हिसा, सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणारे व्हिसा आणि माध्यमांच्या सदस्यांसाठी आय व्हिसा यांची मुदत चार वर्षे राहणार आहे.
नवीन नियमांनुसार, विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिसा चार वर्षांपेक्षा जास्त असणार नाहीत. पत्रकारांचे व्हिसा, जे सध्या अनेक वर्षे टिकतात, ते २४० दिवसांपर्यंत मर्यादित असतील.trump students ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरित चालकांना देशातून हद्दपार करण्याची घोषणा केली. परदेशी चालकांना हाकलून त्यांच्याजागी माजी लष्करी जवानांना नोकरी देण्याच्या सूचना त्यांनी खाजगी कंपन्यांना केल्या आहे. परवाना नसलेले चालक फलक वाचू शकत नाहीत. त्यांच्यापैकी बरेच जण अमली पदार्थ किंवा दारूच्या नशेत असतात त्यामुळे नागरिकांचे नाहक बळी जातात. याला आळा घालण्यासाठी बेकायदेशीर चालकांना देशातून बाहेर काढले जाईल.
दहशतवाद्यांना करणाऱ्यांना प्रवेश नाही