अवैध रेती वाहतूक करणारे चार डंपर पकडले

-१ कोटी ६९ लाखाचा मुद्देमाल जप्त -८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
वरूड, 
illegal-sand : पांढुर्णा ते पुसला मार्गे वरूड कडे येणाऱ्या ४ रेतीच्या डंपरवर वरूड पोलिसांनी कारवाई करत एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून १ कोटी ६९ लक्ष रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेले सर्व डंपर मोर्शी येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातून काही ट्रक अवैधरित्या रेती भरुन मोर्शी जात असल्याची गुप्त माहिती शुक्रवार १७ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरूड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार अशोक जाधव यांनी शहरातील जायंट चौकात नाकाबंदी केली. सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पांढुर्ण्याकडून येणाऱ्या चार वाहनांची तपासणी केली.
 
 
 
jkm
 
 
 
यावेळी डंपर मध्ये रेती असल्याचे दिसून आले. त्यामुळे चारही डंपर चौकशीकरिता ठाण्यात जमा करून डंपर चालकांची चौकशी केली. तेव्हा डंपर चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना (रायल्टी) नसल्याचे निष्पन्न झाले. डंपर चालकांनी वाहन मालकाच्या सांगण्यावरुन मध्यप्रदेशातून अवैद्यरित्या रेतीचे उत्खन्न करुन रेतीची वाहतूक करताना मिळून आल्याने डंपर क्रमांक एम एच २७ बी एक्स ९७४७ चालक पवन मोहन शर्मा (३९) रा.जयस्तभं चौक मोर्शी, एम एच २७ डी टी ७७९२ चालक पवन सुखदेव नांदणे (२७) रा. खंबी बेलोरा, ता. आष्टी जि. वर्धा, एम एच २७ डी टी ७५५३ चालक प्रफुल अशोक खरबडे (३५) रा. खंबीत बेलोरा, ता.आष्टी, जि. वर्धा, एम एच २७ बी एक्स ९५५९ चालक आर्यन गजाननराव परतेकी (२२) रा. जिजाऊ नगर मोर्शी यांचे ताब्यातून चार डंपर व डंपर मधील ७ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ६९ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चारही चालकासह डंपरचे मालक मनीष सुरेश दंदे, मोहीत अविनाश लांडे, गौरव राम धोटे, गोलु उर्फ शेख बशीर सर्व रा. मोर्शी यांचे विरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहे. चालकांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सदर कारवाई पोनि. अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात संतोष वंजारी, मनोज वानखडे, राहुल केंडे यांनी केली असून अधिक तपास सापेनि. निलेश चावडीकर करीत आहे.