तुकाराम मुढेच्या दहशतीचा भामट्याकडून गैरवापर

*हॉटेल चालकास भ्रमणध्वनीवर संदेश

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
tukaram-mundhe : नियमबाह्य हॉटेलवाल्यांवर दररोज कारवाई सुरु आहे. तुकाराम मुंढे नावाच्या कर्तव्यदक्ष दहशतीचा मात्र काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असून बुलढाण्यातील काही हॉटेल मालकांना तोतया अन्न निरीक्षकाने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून लाचेची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा तोतया निरीक्षक मुंबई घाटकोपर भागातून भ्रमणध्वनीवरून पैशांसाठी फोन पे नंबरही देत आहे. अशा भ्रमणध्वनीच्या फसवणूकिला बळी पडून कुणीही आपले नुकसान करून घेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
jmlk
 
 
 
सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नांव महाराष्ट्राच्या ओठावर आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी अन्न व औषध माफियांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाया. अनेक ठिकाणी हॉटेल, पानटपर्‍या बंद करून विक्रेते घरी पळत आहेत. नियमबाह्य आणि अवैध कामे करीत आहेत, ते धाकात आहेत.
 
 
संपूर्ण महाराष्ट्रातील हे चित्र ऑनलाईन भामटेगिरी करणार्‍यांनी हेरले असून आता त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नावाने फसवेगिरी सुरु केली आहे. दि. १७ जुलै रोजी बुलढाण्यातील काही हॉटेल व्यावसायिकांना आला. बुलढाण्यातील इकबाल चौकात स्थित हॉटेल दावतचे मालक शेख यांना एक भ्रमणध्वनी आला. मी फूड अँड ड्रग्ज विभागातून बोलतोय इन्स्पेटर संदीप शिंदे तुमच्याकडे फूडचे लायसन्स नाही. फायरचे ऑडिट नाही. तुम्हांला ४२ हजार ८०० रूपये दंड पडेल आणि तुमचे हॉटेल २४ दिवस बंद राहील. अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर हॉटेल दावतवाले घाबरले. परंतु दहा दिवस आधीच फूड अँड ड्रग्जकडून आपल्या हॉटेलचे तपासणी झालेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्याकडे लायसन्स असूनसुद्धा लायसन्स नसल्याचे सांगणारा संदीप शिंदे कोण सर्व काही नियमानुसार असूनही आपल्याला दंडाची भिती का दाखविली जाते तरी आपल्यामागे कटकट नको म्हणून जेव्हा दावतच्या अर्सलन शेख यांनी फूड निरीक्षक संदीप शिंदेला प्रकरण निपटण्याचे सांगितले, तेव्हा या निरीक्षकाने पैशांची मागणी केली. तोपर्यंत दावत हॉटेलवाल्यांनी अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांची भेट घेवून संदीप शिंदे’ कोण याविषयी विचारणा केली असता अशा प्रकारचा एकही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचे त्यांनी सांगितले. संदीप शिंदे तोतया अन्न निरीक्षक होता, हे स्पष्ट झाले होते.
 
 
याच तोतया अधिकार्‍याचा कॉल जोशी हॉस्पीटल जवळील हॉटेल सुयोग आल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. हॉटेल सुयोगच्या मालकांनाही गंडविण्याचा प्रयत्न त्यानंतर हॉटेल दावतवाल्योना या तोतयाने भिती दाखविली दोन्ही प्रकरणी अन्न व औषध विभागाचे प्रमोद पाटील यांनी ठाणेदार संग्राम पाटील यांना कळविण्यात आली. तोतया फूड इन्स्पेटर संदीप शिंदे हा मुंबईच्या घाटकोपर भागातील असल्याचे लोकेशन मिळाले. तर त्याने जो फोन पे नंबर दिला हा मोहम्मद रज्जाक परवेज इलेट्रीक असा दाखवित आहे. वरील दोन्ही हॉटेल व्यावसायिक सुजाण आणि सतर्क असल्यामुळे ते या तोतया अधिकार्‍याच्या फसवेगिरीला बळी पडले नाहीत.