नवनीत राणा यांचे हनुमान चालीसा पठन

उद्धव ठाकरेंना सद्बुद्धी झाल्याचा आनंद

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
navneet-rana : उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठन करण्यास सुरुवात केल्याच्या पृृृृृृृृष्ठभूमीवर भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा शनिवारी, १८ जुलैला स्थानिक हनुमान गढी येथे हनुमान चालीसा पठन करणार आहेत.
 
 
hjk
 
 
 
त्या म्हणाल्या की, ‘श्री हनुमान गढी नरेशच्या कृपेने उद्धव ठाकरे यांना श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठन करण्याची सद्बुद्धी मिळाली आहे. ज्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यांना जनतेने वेळोवेळी धडा शिकविला. सत्ता गेली, पक्षात मोठी फूट पडली, अनेक आमदार व खासदारांनी साथ सोडली. ही अहंकाराची शिक्षा असून आता श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसाचे महत्त्व त्यांना उमगले आहे. त्यांनी सांगितले की, हनुमानाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. श्रद्धा, भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजात पोहोचावा, तसेच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना व्हावी या उद्देशाने उद्या, शनिवारी दुपारी २ वाजता श्री हनुमान गढी येथे श्री हनुमान चालीसा पठनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पठनात त्या स्वतः सहभागी होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.