पुसद,
तालुका वार्तापत्र,
रवी देशपांडे,
indranil-naik : राज्यमंत्री इंद्रनील नाईक व पुसद नगर परिषदेच्या अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी काही प्रकल्प हाती घेतले आहे. गेल्या वीस वर्षांपासून पुसदचा विकास रेंगाळला होता. परंतु नाईक दांपत्याने पुसदच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी त्यांनी तीन प्रकल्प हाती घेतले आहे. मात्र हाती घेतलेले प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी राज्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे.
यात पुसद शहराची महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना, माळपठारावरील शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रस्ताव व पुसद दिग्रस रस्त्यावरील पुस नदीवरील पुलाचे विस्तारित बांधकामाचा समावेश आहे. 57 कोटी रुपयांची महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. पुढील पन्नास वर्षासाठी ही योजना कामी पडू शकते. योजनेच्या मूळ प्रारुपाप्रमाणे काम विहीत मुदतीत पूर्ण झाले नाही. अनिश्चित काळासाठी ही योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु हे काम लवकर व्हावे अशी पुसदच्या जनतेची भावना आहे.
एकतर मुदतीत काम व्हावे व दर्जेदार रहावे कारण जनतेच्या जिव्हाळ्याची ही योजना आहे. पुसद नागपूर रस्त्यावरील पुस नदीवरील पुलाचे विस्तारित बांधकाम दोन तीन वर्षापासून सुरू आहे. संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे वाहतुकीला कमालीचा अडथळा निर्माण झाला आहे. एक तर वाहनांची वाढलेली अफाट संख्या व पुलावरील अरुंद रस्ता यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. हे काम कुठवर चालणार. तिसरे व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे माळपाठारावरील चाळीस गावातील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन इसापूर धरणातील बँक वॉटर माळपठारासाठी मिळावे अशी मागणी केली.
लगेच मंत्री महोदयांनी योजनेचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. थोडक्यात पुसद शहरासाठी अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठा योजना, पुस नदीवरील पुलाचे विस्तारित बांधकाम व माळपठरावरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रकल्प इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या या टर्ममध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्यास पुसदची जनता इंद्रनील नाईक यांना विकासपुरुष म्हणून संबोधतील यात काही शंका नाही फक्त एवढेच हे प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण व्हावे एवढेच...