नागपूर,
Kamala Nehru College महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MITSC) आणि कमला नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसद शपथविधी सोहळा पार पडला.
प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक कविता इसाकर यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त, आत्मविश्वास आणि कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, उपप्राचार्य डॉ. निनाद काशीकर आणि समन्वयक डॉ. एस. डी. देशभ्रतार उपस्थित होते. नव्याने गठित करिअर संसदेच्या सदस्यांनी पद व कर्तव्याची शपथ घेत वर्षभर विविध करिअर मार्गदर्शन व कौशल्यविकास उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
सौजन्य:सायली लाखे ,पिदळी ,संपर्क मित्र