सामदा परिसरात दहशत पसरविणारा बिबट जेरबंद

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |

samda
 
 
सावली, 
Leopard spreading terror captured तालुक्यातील सामदा गावात मागील काही दिवसांपासून दहशत पसरविणार्‍या बिबट्याला अखेर वनविभागाने 15 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पिंजर्‍यात जेरबंद केले. तालुक्यात हत्तींचा धुमाकुळ सुरू असताना वाघ, बिबटे काही दिवसांसाठी दडी मारून बसल्याचे आढळून आले. मात्र, हत्ती जाताच पुन्हा बिबट्या गावात प्रवेश करूलागल्याने गावकरी भयभीत झाले होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, उपवन परिक्षेत्र अधिकारी मारोती पूल्लेवाड, वनरक्षक शेडमाके, वनरक्षक उपस्थित होते.