भगवान श्री जगन्नाथांचा रथ उद्या यवतमाळात

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
lord-shri-jagannaths-chariot : श्री भगवान जगन्नाथांची रथयात्रा शनिवार, 18 जुलैला यवतमाळात येत आहे. या रथयात्रेत सहभागी होऊन जगन्नाथाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा रथ ओढण्याचीसुद्धा संधी मिळणार आहे. यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रीयदर्शनी उईके, खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पदाधिकारी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
y17July-Jagannath
 
 
 
भगवान जगन्नाथांना रथावर 2-3 वेळा 56 भोग अर्पण केले जातील. महंत सांवरिया बाबा आरती करून नारळ फोडून यात्रेची औपचारिक सुरुवात करतील. ही रथयात्रा श्री दत्त मंदिर चौक येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कीर्तन, नृत्य, प्रसाद, वितरण करत भगवंताचा रथ शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच प्रसादाचा लाभ घेता येईल. रथयात्रेच्या प्रमुख स्थळांवर रंगोळ्या काढल्या जाणार आहेत. जगन्नाथ रथयात्रेत प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.