तभा वृत्तसेवा
मुंबईmaharashtra technology भविष्यातील तंत्रज्ञान क्रांतीमध्ये 'क्वांटम तंत्रज्ञान' ही गेम चेंजर ठरणार आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासन 'महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन' प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे येत्या काळात राज्यात एक भक्कम क्वांटम इकोसिस्टीम उभी राहणार आहे.
maharashtra technology आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेमीकंडक्टरनंतर आता 'क्वांटम' हे विकासाचे तिसरे महत्त्वाचे इंजिन ठरणार आहे. राज्य सरकारचे आगामी काळातील मुख्य उद्दिष्ट हे ५ हजारहून अधिक 'क्वांटम प्रशिक्षित' मनुष्यबळ तयार करणे हे आहे. पहिल्या टप्प्यात ५०० प्रशिक्षक तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सुमारे ६ हजार कोटींच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनच्या धर्तीवर महाराष्ट्र स्वतःचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत आहे.
maharashtra technology आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी आणि व्हीएनआयटी यांसारख्या नामवंत संस्थांच्या सहकार्यातून हे मिशन राबवले जात आहे.क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रभाव अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश संशोधन, संरक्षण आणि उद्योग अशा सर्वच क्षेत्रांवर पडणार आहे. हे लक्षात घेता, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील रोजगारासाठी आजपासूनच सज्ज करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष अभ्यासक्रम आणि 'चंद्र' व 'सूर्य' यांसारख्या आधुनिक चॅटबॉट्सची मदत घेतली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पुढच्या टप्प्यावर म्हणजे 'हाय-स्पीड डेटा प्रोसेसिंग'च्या युगात भारताला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.