नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीमेत दीडशे दुकाने हटविली

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
anti-encroachment : नगरपालिका प्रगासराच्या आदेशावरून अतिक्रमण विरोधी विभागाकडून दि. १६ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीला लागून गेल्या अनेक वर्षापासून फळ विक्रेत्यांसह, चहा विक्रेते, पान टपरी व्यावसायिक तसेच भाजीपाला विक्रेते आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या जयस्तंभचौक ते जांभरून रोड बस स्थानकालगत असलेल्या फळे, भाजीपाला, चहा विक्रेते यांच्या अनधिकृत अतिक्रमणावर पुन्हा नगर पालिकेवा बुलडोजर चालाला नगर परिषदेच्या अतिक्रण विरोधी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेकांचा रोजगार गेल्याने अतिक्रमण धारकांमध्ये रोष दिसून येत करीत होते. अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने न हटविल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे नगर पालिका अतिक्रण विरोधी पथकाचे अधिकारी सुभाष खरात यांनी सांगितले. जवळपास दिडशे दुकाने हटविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 

k