पुन्हा रंगणार धमाल निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो!

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
मुंबई
nilesh sable Zee Marathi वरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वतः निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
 

nilesh sable teases new marathi comedy show fans excited 
निलेश यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर "काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!" असा मजकूर पाहायला मिळतो. पोस्टमध्ये निलेश स्वतःही दिसत असून, नेमका कोणता कार्यक्रम किंवा मालिका येणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन असेल की पूर्णपणे वेगळा शो, याबाबत प्रेक्षकांमध्ये विविध तर्क-वितर्क रंगले आहेत.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये निलेश यांनी लिहिले आहे, "आता या पोस्टला 'शक्तिमान'चं म्युझिक का?… म्हणूनच तर हा शो मॅड आहे…!!! लवकरच…!!!" या भन्नाट कॅप्शनमुळे नव्या शोबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.दरम्यान, चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने "हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे…"अशी कमेंट करत 'चला हवा येऊ द्या'ची आठवण करून दिली. तर दुसऱ्याने, "दादा, तुमच्या शिवाय Zee Marathi मध्ये मज्जाच नाही. लवकर 'चला हवा येऊ द्या'सारखं काहीतरी भन्नाट घेऊन या," अशी भावना व्यक्त केली. अनेक कलाकारांनीही निलेश साबळे यांना नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या असून, "दादा… ओढ लागे जीवा!"अशा कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.सध्या निलेश साबळे यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, त्यांच्या नव्या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.