युद्धाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान?

सौदीसाठी दिला मोठा इशारा

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan warns Saudi Arabia येमेनमधील हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला असून, पाकिस्ताननेही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानने दिला असून, "सौदी अरेबियावरील हल्ला म्हणजे पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल. ही आमची लक्ष्मणरेषा आहे," असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना म्हटले आहे.गेल्या वर्षी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण सहकार्याचा करार झाला होता. या करारानंतर पाकिस्तानचे हजारो सैनिक सौदी अरेबियात तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम पाकिस्तानवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

ian 
 
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला याबाबत आधीच स्पष्ट भूमिका कळविण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षा तज्ज्ञ मुहम्मद अमीर राणा यांनी सांगितले की, परिस्थिती एवढ्या वेगाने बिघडेल, अशी पाकिस्तानला अपेक्षा नव्हती. हुथींकडून हल्ले वाढल्यास सौदी-येमेन सीमेजवळ तैनात पाकिस्तानी सैनिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.निवृत्त जनरल गुलाम मुस्तफा यांनीही परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तान दोन्ही बाजूंमध्ये तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असला, तरी हुथींचे हल्ले तीव्र झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या संघर्षाचा परिणाम तांबड्या समुद्रातील सागरी व्यापारावरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही या घडामोडींमुळे अधिक कठीण झाला आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये अंतरिम करार घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने भूमिका बजावली होती. वाढत्या तणावानंतरही मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार पाकिस्तानने व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. संवाद, चर्चा आणि मुत्सद्देगिरी हाच या संकटावरचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.