महाराष्ट्राचे प्रसिद्ध ज्योतिषी माधवशास्त्री यांचे वैकुंठ निर्वाण

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
देऊळगांव राजा,
madhavshastri : श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथील वैदिक संस्कृतीचे श्रेष्ठ अशी यज्ञपरंपरा अखंड 10 पिढ्यांपासून अग्निहोत्र व्रतसेवा श्री लक्ष्मी व्यंकटेश चरणी अत्यंत कठीण नियमात अग्निहोत्र व्रत परंपरा सांभाळून अत्यंत निष्ठेने यज्ञ नारायणाची सेवा करून आहिताग्नी माधव राजेश्वर अग्निहोत्री यांचे संन्यास पद्धतीने दिनांक 14 जुलै रोजी नारायण चरणी वैकुंठ निर्वाण (निधन ) झाले . त्यांचे वय 76 वर्षे होते.श्री बालाजी मंदिर समोर असंख्य शिष्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
 
 
nhjk
 
 
 
अग्निहोत्री महाराजांनी 1975 पासून अग्निहोत्र व्रत दीक्षा घेऊन 51 वर्षे अखंड अग्निहोत्र सेवा पूर्ण केली . भारतीय परंपरेप्रमाणे ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास ग्रहण करून त्यांनी चार ही आश्रम पूर्ण केले हिमालयात श्री केदारनाथ पासून कांची रामेश्वरम पर्यंत अनेक यज्ञ त्यांनी जनकल्याणासाठी केले विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक उद्योजक राजकारणी डॉक्टर लेखक कलाकार तरुणवर्ग आणि सामान्य लोकांना ज्योतिष्य मार्गदर्शनाने त्यांनी जीवनाला योग्य मार्गदर्शन केले . दिल्ली येथे महान तपस्वी श्री महेश योगीजी आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या आश्रमात जनकल्याण हेतू अग्निहोत्र यज्ञ संपन्न केले. त्यांच्या यज्ञ कार्याच्या गौरव म्हणून स्व. माननीय माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी तसेच स्व. पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार केला . नुकतेच वाराणसी येथे सर संघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते कांची महास्वामी विजेंद्र सरस्वती यांच्या सानिध्यात त्यांचा मोठा सत्कार वाराणसी येथे करण्यात आला. त्यावेळी गणक प्रवर पद्म विभूषण विद्वान श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी यांचे सानिध्य लाभले .
 
 
भारतातील अग्रगण्य तपोमूर्ती म्हणून त्यांना अनेक सत्कार गौरव प्राप्त झाले. दिनांक 14 जुलै 2026 रोजी पहाटे 2:30 वाजता प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. श्री बालाजी महाराज संस्थान यांच्या वतीने राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते संन्याशांचे वस्त्र सन्मान देऊन संन्यास पद्धतीने माधवानंद स्वामी अशी उपाधी देऊन त्यांचा समाधी सोहळा नारायण निर्वाण यात्रा संपन्न होऊन त्यांना समाधी देण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मी व्यंकटेशाचा आणि अग्रीनारायणाचा जयघोष करण्यात आला .समाधी सोहळ्यासाठी जालना नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर तसेच महाराष्ट्रातील अनेक वैदिक विद्वान उपस्थित होते. त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली असून आपल्या सांस्कृतिक क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे . त्यांच्यामागे पत्नी उमाबाई अग्निहोत्री तथा रविंद्र . शशिकांत. किरण. तीन मुले सुना. नाती. नातवंड. असा मोठा परिवार आहे . त्यांचे नातू अगदी लहान वयात विद्वान म्हणून प्रसिद्ध आहेत. अग्निहोत्री महाराजांची चिरंजीव वेदमूर्ती शशिकांत अग्निहोत्री हे प्रसिद्ध विद्वान असून अग्निहोत्र व्रतदीक्षा घेऊन पुढे यज्ञ परंपरा अखंडपणे सुरू ठेवणार आहेत. शोकाकूल समस्त अग्निहोत्री आणि शिष्य परिवार देऊळगावराजा.