‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच पडद्यावर

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
मुंबई,
prahar the ujjwal nikam story राजकुमार राव अभिनीत ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील आणि माजी सरकारी वकील निकम यांनी काही खास गोष्टी सांगितल्या. राजकुमार रावने पारंपरिक संशोधनाप्रमाणे सतत प्रश्न विचारले नाहीत.
 
 
prahar the ujjwal nikam story
 
ते बराच वेळ समोर बसून मी कसा बसतो, फाईल कशी पकडतो आणि कोर्टात युक्तिवाद करताना हातांचा वापर कसा करतो, हेच फक्त पाहत होते. राजकुमारने माझी नक्कल केली नाही, तर संपूर्ण देहबोली आत्मसात केली. त्यांनी मला कमी प्रश्न विचारले, पण माझ्या प्रत्येक सूक्ष्म बारकाव्याला अचूकपणे पकडले, असे उज्ज्वल निकम सांगतात. संवाद पाठ करण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केले.