मुंबई,
rashmika was rejected in 25 auditions रश्मिका मंदाना देशातील मोठ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ‘पुष्पा’, ‘ॲनिमल’ आणि ‘छावा’ यांसारख्या चित्रपटांमुळे तिने पॅन इंडिया स्टारचा दर्जा मिळवला. पण करिअरच्या सुरुवातीला तिला सतत नकार सहन करावे लागले. तिने तब्बल २० ते २५ ऑडिशन्स दिल्या. ज्यात बहुतांश वेळा तिचा चेहरा अभिनेत्रीसारखा नाही, असे सांगून तिला नाकारण्यात आले. घरी परतल्यावर ती रडायची.
एका चित्रपटासाठी दोन ते तीन महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर तो चित्रपटही बंद पडला. तरीही तिने हार मानली नाही आणि पहिल्याच कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून ती स्टार बनली. यश एका दिवसात मिळत नाही, तर ते संयम, अथक परिश्रम आणि स्वतःवरील विश्वासाने मिळते. हीच विचारसरणी त्यांना प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची आणि अधिक मजबूत होऊन पुढे जाण्याची प्रेरणा देत राहिली, असे तिने सांगितले.