ढाणकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ‘राष्ट्रनिर्माण युवा संमेलन’ 19 जुलैला

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
ढाणकी,
nation-building-youth-conference :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ढाणकी खंडाच्या वतीने ‘राष्ट्रनिर्माण युवा संमेलन’ रविवार, 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन आर्य वैश्य भवन, गांजेगाव रोड, ढाणकी येथे होणार असून परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ढाणकी खंड कार्यवाह महारुद्र बिबेकर यांनी केले आहे. या युवा संमेलनात नैपुण्य विकास, शारीरिक सक्षमीकरण आणि बौद्धिक चर्चा यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी पत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी व या राष्ट्रनिर्माण उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
 
 
f