‘आयुष्यातले सांगाती’ त्रिखंडाचे प्रकाशन

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Saijyoti Publication साहित्य भारती, विदर्भ प्रांत आणि साईज्योती पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक लिखित ‘आयुष्यातले सांगाती’ या ग्रंथाच्या भाग १, २ व ३ चे प्रकाशन गुरुवारी नवदुर्गा सभागृहात झाले.
 

pathk
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे उपस्थित होते. Saijyoti Publicationज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एलाबादकर यांनी ग्रंथाचे परीक्षण करत लेखकाच्या संवेदनशील लेखनशैलीचे कौतुक केले. यावेळी अविनाश पाठक यांनी पुस्तकामागील प्रेरणा आणि पत्रकारितेतील अनुभव मांडले. कार्यक्रमाला साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:संजय भुसारी,संपर्क मित्र