नागपूर,
The Blind Relief Association पं. गोपाळराव वाडेगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'मासिक संगीत साधना' अंतर्गत गायन-वादनाचा कार्यक्रम रविवारी (१९ जुलै) सकाळी ९.३० वाजता दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या नवदृष्टी सभागृह, साऊथ अंबाझरी रोड येथे होणार आहे.
पं. गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार व दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात युवा गायिका राधिका पालमवार यांचे गायन होईल.The Blind Relief Association त्यांना तबल्यावर अथर्व शेष, तर संवादिनीवर रितेश तानेलवार साथ करतील. तसेच राम पनके व ओम कुकडे यांचे तबलावादनही होणार असून त्यांना विजय येलूरे लहरा संगत करतील. संगीत रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र