समुद्रपूर,
soybean growers पावसाच्या अभावामुळे अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावे आहे. अशातच काही बियाणे कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना कंपनीकडून एकरी २ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांमार्फत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठविले.

निवेदनात नमुद केल्यानुसार, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्ठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होते. यावर्षी सोयाबीन पेरणी वेळेवर झाली. परंतु शेतात सोयाबीन उगवलेच नाही. यामध्ये प्रामुख्याने बुस्टर कंपनीचे बियाने, विगोर कंपनीचे सोयाबीनची शेतकर्यांनी पेरणी केली. पण, या कंपण्याचे बियाने उगवलेच नाही. अशा बोगस बियाण्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाशी खेळ सुरु आहेत. यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा बँकेचे कर्ज मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी खाजगी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून बियाणे व खताची खरेदी केली. सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसल्याने शेतकरी मानसिक विवंचनेत आहे. आता पावसाने सुरू दांडी मारली आहे.soybean growers तालुका कृषी अधिकार्यांमार्फत शेताची पाहणी करुन कंपनीकडून शेतकर्यांना एकरी २ लाख रुपये मोबदला द्यावा तसेच संबंधित कंपनीवर कायमची बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत, उपाध्यक्ष राजेश सावरकर, प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, संतोष सेलूकर कीर्ती सवाई, मुरलीधर चौधरी, जगदीश संचारीया, आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी सरपंच प्रशासन उपस्थित होते.