मुंबई
monsoon : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा जोरदार सक्रिय होणार आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडील वाऱ्याचा वेग वाढल्याने समुद्रात उंच लाटा उसळत असून, जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रात ताशी अंदाजे 40 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहू लागले. तसेच स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज मुंबईच्या उपनगरात किंचित हलका पाऊस पडला. मध्य मुंबईत दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. पहाटे आणि दुपारी पावसाच्या किंचित सरी कोसळत असल्या, तरी हवामान बदलामुळे मुंबईकरांना घाम येण्याचे प्रमाण मात्र कमी झाले नव्हते.
गेल्या वीस दिवसांपासून गायब असलेल्या वरूनराजाने शुक्रवारी गडचिरोलीसह जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकèयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी धान पर्ये आणि अवत्या करपण्याच्या मार्गावर असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकèयांवर होते. सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला.
गेली आठ ते दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने पकाही भागात एकदा बरसण्यास सुरुवात केल्यानंतर रायगडमध्ये भातशेती लावण्याच्या कामांना वेग आला आहे. मुळातच पाऊस उशीरा सुरु झाल्याने शेतकरी चिंतातुर होता त्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतीवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. आठ दहा दिवसांनंतर पुन्हा दमदार पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतात लावणीच्या कामांना आता वेग आल्याचे रायगडमध्ये पाहायला मिळत आहे.