टस्कर हत्तीचे पुन्हा सावली तालुक्यात आगमन

परिसरात भीतीचे वातावरण, शेतकरी चिंतेत

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
सावली,
tusker elephant हप्ताभर विश्रांती घेतल्यानंतर टस्कर हत्ती पुन्हा 15 जुलैला गडचिरोली जिल्ह्यातून सामदा दागोबा देवस्थान मार्गे सावली तालुक्यात दाखल झाला आहे. या हत्तीचा मुक्काम सध्या उमरी तलाव परिसरात असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
elephan
 
गडचिरोली जिल्ह्यातील दोन टस्कर हत्ती 23 मे रोजी सावली तालुक्यात वैनगंगा नदीच्या पात्रातून दाखल झाले होते. त्या दोन हत्तीच्या मुक्कामानंतर लगेचच 27 हत्तीचा कळप पुन्हा सावली तालुक्यात दाखल झाला होता आणि अख्खा सावली वनपरिक्षेत्र हत्तीच्या कळपाने पिंजून काढून वनविभागाच्या नाकी दम आणले होते. वन विभागाणी हत्तीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यानंतर हत्तीचा कळप 2 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात रवाना झाला. परंतु त्यातील एक टस्कर हत्ती कळपाला सोडून एकटाच भटकत असल्याचे कुणाचाही निदर्शनास आले नाही.
 
 
त्या टस्कर हत्तीने सोनापूर येथे एका शेतकर्‍यावर हल्ला करून ठार केले. त्यामुळे वनविभाग पूर्णतः हताश झाला. त्यानंतर शेतकर्‍याला मारणारा हा टस्कर हत्ती त्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यात रवाना झाला. त्यामुळे वनविभागाने अखेर सुटकेचा श्वास घेतला. हप्ताभर विश्रांती घेतल्यानंतर हा टस्कर हत्ती पुन्हा 15 जुलैला वैनगंगा नदी पात्रातून गडचिरोली जिल्ह्यातून वाकडी, शिवनी भागातील जंगल परिसरातून सामदा दागोबा देवस्थान मार्गे सावली तालुक्यात दाखल झाला आहे.