विम्बल्डनमध्ये उर्वशी-लोकीची खास भेट

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
लंडन,
urvashi and lokis special meeting बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२६ दरम्यान हॉलिवूड अभिनेता टॉम हिडलस्टन याच्यासोबत झालेल्या भेटीमुळे चर्चेत आली आहे. मार्व्हल चित्रपटांमध्ये 'लोकी' ही लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या टॉमसोबतचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. उर्वशीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती आणि टॉम हिडलस्टन विम्बल्डन परिसरात संवाद साधताना, हस्तांदोलन करताना आणि हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. या खास प्रसंगासाठी उर्वशीने पिवळ्या रंगाचा ड्रेस, त्याच रंगाची हँडबॅग आणि हिल्स परिधान केल्या होत्या, तर टॉम हिडलस्टन नेव्ही ब्लू पट्टेदार सूटमध्ये दिसला.
 
urvashi and lokis
व्हिडिओसोबत उर्वशीने विम्बल्डनमधील अनुभव शेअर करत, अंतिम सामना अविस्मरणीय ठरल्याचे म्हटले आहे. तिने जॅनिक सिनर याचे विजेतेपदाबद्दल अभिनंदन करत अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्धचा सामना उत्कंठावर्धक असल्याचे नमूद केले. तसेच टॉम हिडलस्टनसोबत घालवलेला वेळ संस्मरणीय असल्याचेही तिने लिहिले. मात्र, व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यावर विनोदी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी टॉम हिडलस्टन संवादातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला, तर काहींनी उर्वशीच्या संवादशैलीवर हलक्या-फुलक्या स्वरूपात टिप्पणी केली. अनेक कमेंट्समुळे हा व्हिडिओ अधिकच चर्चेत आला.
यंदाच्या विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतासह जगभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. भारतीय कलाकारांमध्ये मोहनलाल, प्रियांका चोप्रा जोनास, लारा दत्ता, अनन्या पांडे, श्रीलीला, अर्चना पुरण सिंग, कल्याणी प्रियदर्शन, फरहान अख्तर यांच्यासह क्रिकेटपटू शुभमन गिल, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनीही अंतिम सामन्याचा आनंद घेतला. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांमध्ये डेव्हिड बेकहॅम, निकोल किडमन, जेनिफर लोपेझ, अँड्र्यू गारफिल्ड, जो जोनास, बेनेडिक्ट कंबरबॅच यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दरम्यान, उर्वशी रौतेला अलीकडेच रणदीप हुडा याच्यासोबतच्या 'इन्स्पेक्टर अविनाश' या मालिकेत झळकली होती.