जिल्ह्यात ९५ टक्के मतदारांपर्यंत पोहोचले गणनापत्र

एसआयआर मोहिमेला वेग;८ ऑगस्टपर्यंत मिळाली मुदतवाढ

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
अकोला,
voting-slips : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्‍या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरु आहे.कार्यक्रमाच्‍या वेळापत्रकात आयोगाने अंशतः बदल केला असून आता ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणनापत्र भरून त्याचे डिजिटाईज होणे आवश्यक आहे. याआधी ही मुदत २९ जुलै पर्यंत होती. दहा दिवसांची मुदत वाढ मिळाल्याने मतदारांना देखील दिलासा मिळाला आहे.
 
 
 
jk
 
 
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील एकुण १ हजार ७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडून १५ लाख ९५ हजार ६४४ मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून शुक्रवार, १७ जुलै ९५.५ टक्के मतदारांपर्यंत गणनापत्र पोहोचले असून त्यापैकी ४७.११ टक्के मतदारांचे डिजिटाईज झाले आहे. त्यामुळे मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणे समोर उभे ठाकले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी ३० जून ते ८ ऑगस्ट पर्यंत गृहभेटी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण ८ऑगस्ट पर्यंत, मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्दी १७ ऑगस्ट, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १७ ते १६ ऑगस्ट, नोटीस कालावधी दावे व हरकती निकालात काढणे १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर, मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल.विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हानिवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे.
 
 
विधानसभा मतदार गणनापत्र डिजिटाइज (टक्के)
 
 
अकोट ३०६९१२ ९९.९२. ५२.५८
बाळापूर ३०७८५४ ९९.२३ ४६.३५
अकोला प.३३३५६१ ७९.६२ २३.३७
अकोला पूर्व ३५०१९३ ९८.६७ ४९.५६
मुर्तिजापूर २९७१२४ ९८.७५ ६६.०२
ए‍कूण १५९५६४४ ९५.०५ ४७.११
 
 
मदत कक्षाची स्थापना
 
सर्व एसडीओ कार्यालय, उपजिल्‍हाधिकारी महसूल, जिल्‍हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मदत कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. यामध्ये अकोट विधानसभा मतदार संघासाठी दूरध्वनी क्रमांक ९४२०१४६६५९, बाळापूर- ७७४१८४५९८८,९७६३८६६६९९,अकोला पश्चिम-८०१०३८४०१४, अकोला पूर्व- ७७७४००७६०८, मुर्तिजापूर- ९५५२७१५४६२, ८६९८२९५१७७ या क्रमांकावर मतदारांना मदतीसाठी संपर्क करता येईल.तसेच १९५० हा टोल फ्री क्रमांक आहे.मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दीपर्यत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत हा मदत कक्ष सुरू राहील.
 
ऑनलाईन सुविधा उपलब्ध
 
मागील मतदार यादीतील स्‍वतःचे किंवा संबंधित नातेवाईकांचे नाव ईसीआय नेट हे अॅप्‍लीकेशन गुगल प्‍लेस्‍टोअर वरुन डाऊनलोड करुन तसेच https://voters.eci.gov.in या संकेतस्‍थळावर तपासू शकतात आणि गणना पत्रातील माहितीची पडताळणी करुन दोन्ही प्रती मध्ये योग्य माहिती भरुन आणि स्वाक्षरी करुन गणना पत्राची एक प्रत आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडे जमा करावी.मतदारांस आपले गणना प्रपत्र इसीनेट वर https://voters.eci.gov.in या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरता येईल.याच अॅप मधील बुक अ कॉल विथ बीएलओ या सुविधेचा वापर देखील मतदारांना करता येईल.