आता आलाच आहेस तर दमदार ये

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा
rain  तो गेल्या अनेक वर्षांपासुन हुलकावणी  देतो नव्हे रडकुंडीलाही आणतो... पण, तो तसा आवडता. त्याच्या येण्याची चातकासारखी वाट बघितल्या जाते. यंदा तो आलाही आणि गेला... त्याचे येणे स्वप्नवतच ठरले. आता आलाच आहेस तर दमदार ये तो येऊन गेला... तो परत यावा याचा धावा सुरू झाला. काल तो लाजल्यागत दबक्या थेंबांनी ट्रायल घेत आला. आज जरा त्याने हिम्मत वाढवली. दबक्या पावलाने त्याचे दिवसभर टपटप सुरू होते... तो म्हणजे पाऊसच बरं का!
 
rain
 
rain  वर्धा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासुन पाऊस मृग नक्षत्रामध्ये येतच नाही. आला तरी नंतर डोळे वटारतो. यंदाही त्याने आपली मुसाफिरी कायम ठेवली. मृग नक्षत्र उन्हाच्या चटक्यात गेले. त्यानंतर जरा वरुणराजाला पाझर फुटला. पेरणी योग्य पाऊसही झाली. शेतकर्यांनी बियाणे धरणीमातेच्या स्वाधिन केले. बी अंकुरत नाही तोच पुन्हा पाऊस गायब झाला आणि शेतकर्यांवर दुबार पेरणीची कुर्हाड कोसळली. त्यातच बियाणे कंपन्या नतद्रष्ट ठरल्या. जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांच्या हजारो एकर मधील सोन्या सारखं असलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही. यात बुस्टर नावाच्या बियाणे कंपनीने शेतकर्यांचा विश्वासघात गेला. त्यामुळे शेतकरी गलीतगात्र झाले असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये! निसर्गासोबत माणवीवृत्तीनेही शेतकर्यांना अडचणीत आणले. बियाण्यांचे पैसे परत करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु, पैसेच तर दिलेच नाही. सोबत शेतकर्यांना पुन्हा करावा लागणारा खर्च कोण देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
 
rain  शेतकाऱ्यान  वेठीस धरणार्या बुस्टर कंपनीवर गुन्हे दाखलही झाले. परंतु, या कंपनीला काळ्या यादीच टाकण्याची शिक्षा दिल्या गेली पाहिजे. बियाण्यांच्या दृष्टचक्रात अडकून असलेल्या शेतकर्यांना गेल्या १२ दिवसांपासुन पावसानेही मिठ चोळले. शेतकर्यांसह सामान्य नागरिकही पावसाची वाट पाहत होता. अखेर, काल शुक्रवारी सायंकाळपासुन पावसाचे थेंबथेंब आगमण झाले. आजही सकाळपासुन आकाश धरणीमातेला भेटायला आल्यासारखे खाली आल्यासारखे वाटत होते. परंतु, तसा पाऊस बरसला नाही. रिमझिम पावसाने जिल्ह्याला आपलेसे केले. रस्ते ओले झाले, गरमी पासुनही दिलासा मिळाला आणि पिकांना जिवदान! आता चांगल्या पावसाची तेवढी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि धरणं अजून कोरडेच आहेत.