ढाका,
bangladesh president बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचा मारेकरी लष्कराचा माजी मेजर मुजफ्फर हुसेनला तब्बल ४५ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर, पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून हुसेनला लष्करी न्यायालयात खटल्यासाठी बांगलादेश लष्कराच्या ताब्यात दिले. हे तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारचे मोठे यश मानले जात आहे.
खटल्याच्या कागदपत्रांनुसार, हुसेनने ३० मे १९८१ रोजी सकाळी चित्तगोंग सर्किट हाऊसमध्ये तत्कालीन राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. लष्कराच्या मध्यम-स्तरीय अधिकाऱ्यांच्या एका गटाने सर्किट हाऊसवर हा हल्ला करून सत्ताधारी बीएनपीचे संस्थापक झियाउर रहमान यांची हत्या केली. या हत्येत थेट सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हुसेन आणि कॅप्टन मोसलेह उद्दीनचा समावेश होता, असा अधिकाऱ्यांचा आराेप आहे.