अभिषेक बॅनर्जींच्या कार्यालयावर बुलडोझरची कारवाई!

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
परगणा,
bhishek banerjee तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील आमताला येथील कार्यालयावर शनिवारी प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली. परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचा आरोप असलेल्या या पाच मजली इमारतीवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत इमारत पाडण्यास सुरुवात केली. कारवाईपूर्वी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच तीन बुलडोझर घटनास्थळी आणून पाडकाम सुरू करण्यात आले.
 
bhishek banerjee
 
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या कार्यालयाच्या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ३० जून रोजी प्रथम नोटीस बजावून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ७ जुलै रोजी दुसरी नोटीस पाठवण्यात आली. या नोटिशीत १५ जुलै रोजी जिल्हा प्रशासनासमोर हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
 
प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनदा नोटीस देऊनही अभिषेक बॅनर्जी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच ते सुनावणीसाठीही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढत प्रशासनाने इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर हे कार्यालय बंद असल्याचेही प्रशासनाने सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, तृणमूल काँग्रेसकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.