गडचिरोली
gondwana-university गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, डिशनल डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट), मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, भारत सरकार आणि सृष्टी फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त वतीने कुरखेडा तालुक्यातील येरंडी येथे दुसर्या ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
gondwana-university या कार्यक्रमाचे उद्घाटन कुरखेडाचे नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डेव्हलपमेंट कमिशनर कार्यालयाचे अतिरिक्त संचालक अवधेश ठाकूर, हँडीक्राफ्ट प्रोमोशन ऑफिसर दिलीप कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख स्वप्निल गिरडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कुरखेडा, कोरची व वडसा परिसरातील कारागीर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
gondwana-university कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आर्टिसन कार्डचे महत्व कारागिरांपर्यंत पोहोचविणे, योजने अंतर्गत मिळणार्या शासकीय लाभांची माहिती देणे आणि प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेबाबत मार्गदर्शन करणे हा होता. यासोबतच डी. सी. हँडीक्राफ्ट (डेव्हलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट) मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स मार्फत कारागिरांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामुळे कारागिरांना विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन मिळाले .
gondwana-university याशिवाय या कार्यक्रमात 85 कारागिरांनी सहभाग नोंदविला. उपस्थित कारागिरांकडून आर्टिसन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्वीकारून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कारागिरांना राष्ट्रीय स्तरावरील ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला. यावेळी नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांनी कारागिरांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. अवधेश ठाकूर यांनी कारागिरांना आर्टिसन कार्डचे महत्त्व, त्याद्वारे मिळणार्या सुविधा, बाजारपेठेशी जोडणीच्या संधी तसेच मुद्रा कर्ज योजनेद्वारे उपलब्ध होणार्या आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली.