देवदर्शनाला आली गौमाता !

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Devdarshan Gaumata शहरातील एका मंदिरात सायंकाळच्या दिवेलागणीच्या वेळी गाभाऱ्यासमोर निवांत बसलेल्या गौमातेच्या उपस्थितीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मंदिर परिसरात दिवेलागणी झाली असली, तरी गाभाऱ्यातील दिवा तेवला नव्हता. अशा शांत वातावरणात गौमाता जणू चिंतनमग्न असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 

cow 
 
 
 
पूर्वी गावांतील मंदिरांच्या पारावर ग्रामस्थ एकत्र येऊन आरती, हरिपाठ व सामुदायिक प्रार्थना करत असत. त्यामुळे मंदिर परिसर भक्ती आणि सामाजिक संवादाचे केंद्र बनत असे.Devdarshan Gaumata आज मंदिरांची संख्या आणि भव्यता वाढली असली, तरी अशा सामुदायिक उपक्रमांमध्ये घट होत असल्याचे जाणवत आहे.मंदिरातील गौमातेच्या या शांत उपस्थितीतून श्रद्धा, संस्कृती आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडले .
सौजन्य : ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र