भंडाऱ्यात पाऊस अविश्रांत...

शेतकरी सुखावला, कामाला गती

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
भंडारा 
rain in bhandara मागील आठवडाभर गायब झालेल्या पावसाने आता अविश्रांत हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून सतत जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले चिंतेचे सावट धुऊन काढले आहे. आज 18 जुलै रोजी दिवसभर सतत पडलेला पाऊस शेती कामाला गती देणारा असाच आहे. मात्र आज पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची वास्तविकता पुढे आणली आहे.

rain in bhandara 
rain in bhandara पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होता. धानाजी नर्सरी वाळू लागली होती, शेतीची कामे खोळंबली होती. भविष्यातील दुष्काळाच्या स्थितीचे चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे उभे राहू लागले होते. शेतकरी अडचणीत होताच, पण सामान्य नागरिकही गायब झालेल्या पावसामुळे वैतागला होता.
 
rain in bhandara अखेर मागील दोन दिवसापासून सुरू असलेला पाऊस चिंतेच्या वातावरणावर पडदा टाकणारा ठरला. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आज 18 रोजी अविष्रांत पडत शेती ओलीचिंब केली. आज जरा वेळही पावसाने विश्रांती घेतली नाही हे विशेष. त्यामुळे मरण्याच्या अवस्थेत गेलेल्या धानाच्या नर्सरीला नवसंजीवनी मिळाली. रोवणीची कामे सुरू होऊन शेतकरी कामाला लागला. अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दोन दिवसाच्या पावसाने कामाला लावले असेच म्हणता येईल.
 
rain in bhandara सतत पडत असलेला हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असला तरी भंडारा शहरात मात्र पावसाचा व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मनस्ताप झाला. शहरात रस्त्याची कामे अर्धवट असल्याने रस्त्यावरील पाणी आजूबाजूच्या दुकानात आणि गोदामात शिरून नुकसान झाले. भूमिगत गटार योजनेसाठी अनेक रस्ते खोदले गेले होते, त्या ठिकाणी चिखलाची स्थिती निर्माण होऊन तेथे वाहन फसल्याची ही माहिती आहे. या पावसाने भंडारा शहरातील रस्त्याची बिकट अवस्था उघड केली.