वर्धा,
arogya amrut mahotsav पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यात ‘आरोग्य अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवांतर्गत जिल्ह्यात चार ठिकाणी महा आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. त्यातील पहिले शिबिर वर्धा येथे होणार असून या शिबिराच्या तयारीचा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि शिबिराच्या नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियाच्या धर्तीवर आरोग्य अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिले महा आरोग्य शिबिर २२ ते २४ जुलै दरम्यान स्थानिक बच्छराज सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन २२ रोजी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. यावेळी अन्य मंत्रीही उपस्थित राहणार आहे. आर्वी येथे ३१ जुलै ते १ ऑगस्ट, हिंगणघाट येथे ८ व ९ ऑगस्ट तर देवळी येथे १३ व १४ ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिरे पार पडणार आहे.
वर्धा येथे आयोजित शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहण्याची शयता आहे. त्यामुळे तेथे वाहतूक व्यवस्थापन, गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात यावे.arogya amrut mahotsav तेथे येणार्या नागरिकांना भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मंडप, स्टेज तसेच रुग्णांची तपासणी करण्यासाठी महिला व पुरुषांकरिता वेगवेगळे तपासणी कक्ष व त्यासाठी पुरेशे डॉटर्स व आरोग्य कर्मचारी याचा जिल्हाधिकार्यांनी आढावा घेतला.
वर्धेत शिबिराच्या पहिल्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियोजनाची माहिती सादर केली. महाआरोग्य शिबिराच्या तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी वान्मथी सी., सीईओ पराग सोमण व अन्य