आंतरजिल्हा चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

तीन गुन्हे उघडकीस

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
ब्रम्हपुरी
gang-of-thieves स्थानिक गुन्हे शोध पथकाने एका आंतरजिल्हा चोरांच्या टोळीतील सराईत विधीसंघर्ष बालकांना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ब्रम्हपुरीतील एका धाडसी घरफोडीसह चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
 
chandrapur gang
 
gang-of-thieves येथील पटेलनगर परिसरातील रहिवासी व उपहारगृह व्यावसायिक विरल हलवादीया यांचे सावरकर चौक येथे स्विटमार्टचे दुकान आहे. 14 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील 6 ते 7 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी विरल हलवादीया यांच्या फिर्यादीवरून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेले तीन विधीसंघर्ष बालक हे गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिन्ही बालकांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्यांनी ब्रम्हपुरीतील स्विटमार्टच्या दुकानफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली रोख रक्कम हस्तगत केली.
  
gang-of-thieves एवढेच नव्हे तर, अधिक तपासादरम्यान या टोळीतील एका बालकाने चंद्रपूर शहरातून दोन दुचाकी वाहने चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी 90 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यासोबतच चंद्रपूर येथील रामनगर पोलिस ठाणे अंतर्गत दाखल असलेले दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
gang-of-thieves ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज खडसे, हवालदार मुकेश गजबे, अंमलदार वशिष्ठ रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान आदींनी केली.