नैसर्गिक शेती आणि सुरक्षित फवारणी मार्गदर्शन

सराटीतील महिला शेतकरी गटाचा आदर्श उपक्रम

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
मारेगाव,
safe spraying रासायनिक शेतीच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पृष्ठभूमिवर नैसर्गिक शेतीचा स्वीकार, सुरक्षित फवारणीची संस्कृती आणि स्वच्छतेची जनजागृती उपक्रम सराटी येथे पाहायला मिळाला. श्री साई नैसर्गिक महिला शेतकरी गटाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या बहुआयामी उपक्रमाने पर्यावरणपूरक शेती आणि सामाजिक जबाबदारीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तब्बल 18 एकर क्षेत्रावर दशपर्णी अर्काची फवारणी करून नैसर्गिक शेतीचा संदेश दिला. या फवारणीबाबत नागरिकात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये व प्रत्येक शेतकèयापर्यंत सुरक्षित फवारणीचे महत्त्व पोहोचावे, या उद्देशाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
 
 
safe spraying
 
यावेळी नैसर्गिक शेती, सुरक्षित फवारणी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी जनजागृती फेरी काढण्यात आली. महिला सदस्यांनी घोषणांद्वारे व संवादातून ग्रामस्थांना रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला सहायक कृषी अधिकारी विनायक जुमनाके यांनी उपस्थित राहून महिला शेतकèयांना फवारणी किटचे वितरण केले. त्यांनी सुरक्षित फवारणी करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर, विषबाधेपासून बचाव, चुकीच्या फवारणीचे आरोग्यावर होणारे तत्काळ व दीर्घकालीन परिणाम, तसेच गरोदर महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
 
 
कार्यक्रमानंतर महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवत सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसर स्वच्छ केला. त्यामुळे शेती, पर्यावरण व स्वच्छता या तिन्ही क्षेत्रांतील सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावासमोर उभा राहिला. सराटी येथील श्री साई नैसर्गिक महिला शेतकरी गट सामाजिक, पर्यावरणपूरक व कृषीविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेत असून, या उपक्रमात हर्षा मनोज ढेंगळे, शारदा नंदकिशोर वèहाटे, उषा नरेंद्र काटोके, पुष्पा विनोद ढेंगळे, वैशाली दिनेश चोपने, वनिता गोकुळ ढेंगळे, शिला संतोष टोंगे, आरती जितेंद्र सपाट, मीनाक्षी सूर्यभान वानखडे, नलिनी चंद्रभान वानखडे, गोदाबाई बंदुजी तुरणकर, निर्मला जगन भोगेकर, माधुरी गजानन खिरटकर व कल्पना नरेंद्र आस्कर यांनी सहभाग नोंदविला.