जलतरणपटू स्वर्णिम चेपे याची भारतीय वॉटरपोलो संघात निवड

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट
hinganghat swimmer हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरणपटूंनी उत्तम कामगिरी करत विदर्भाचे नाव उज्ज्वल केले आहे. १५ ते २५ रोजी दरम्यान थायलंड बँकॉक येथे आयोजित होणार्या बाराव्या एशियन एज ग्रुप आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरणपटूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यात मूळचा हिंगणघाट येथील स्वर्णिम मिलिंद चेपे याची निवड झाली आहे.
 

hinganghat swimmer swarnim chepe selected for indian water polo team for asian age group championship 
स्वर्णिम वयाच्या सहाव्या वर्षापासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावावर नियमित सराव करीत आहे. १४ ते १७ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याला अनेक पदके मिळालेली आहेत. पुणे येथे झालेल्या मिनी ऑलम्पिक वॉटर पोलो स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले. सन २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ज्यूनियर व सीनियर वॉटरपोलो स्पर्धेत सुवर्ण व रजत पदके मिळविली. आतापर्यंत त्याने तीन सुवर्ण, चार रजत व दोन कांस्य पदके पटकावली.यशाचे श्रेय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत वडील मिलिंद चेपे, आई डॉ. मंजिरी, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, अमरावती जलतरण संघटनेचे अध्यक्ष वसंत हरणे, प्रा. डॉ. टॉमी जोश, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रशिक्षक प्रा. डॉ. योगेश निर्मळ तसेच मयूर कुमार व वैभवी थेटे यांना दिले आहे.