क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार : गजबे

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
कुरखेडा
krishnaji-gajbe जनतेच्या प्रश्‍नांबाबत आपण सातत्याने प्रयत्नशील असून आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा राज्य परिषद सदस्य कृष्णाजी गजबे यांनी केले.

kurkheda 
 
 
krishnaji-gajbe  भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी तालुका संघटन बैठक पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
 
krishnaji-gajbe  अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये होते. बैठकीला अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसेनी, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, उमेश वालदे, नगरपंचायत सभापती सागर निरंकारी, आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश उईके, जिल्हा सचिव कृष्णाजी चंद्रमा, महादेव पुंगळे, अंगराज कराडे, उल्हास देशमुख, जिल्हा सचिव रूपाली कावळे, कल्पना मांडवे, आदींची उपस्थिती होती.
 
krishnaji-gajbe  यावेळी मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या आरमोरी विधानसभा क्षेत्र समितीच्या सहअध्यक्षपदी कृष्णा गजबे यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.